प्रफुल राजपूत यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी तर संतोष कचरे पाटील यांची लोणावळा शहर कार्याध्यक्षपदी निवड

मावळ मराठा न्युज -लोणावळा,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे व पुणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद सिंग गोतरणे व पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्तजी निकम यांच्या हस्ते श्री प्रफुल सरदारसिहं रजपूत यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाचे तर श्री संतोष दत्तात्रय कचरे पाटीलयांना लोणावळा शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष पदी निवड झाल्याबद्दलचे नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले. यावेळी मावळ तालुका तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ पडवळ व पुणे जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष अतुलजी राऊत उपस्थित होते. येणाऱ्या आगामी लोणावळा नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.पक्षवाढी साठी पुढील काळात काम करणार असल्याचे मावळ मराठा न्युजशी बोलतांना नवनिर्वाचित पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल सरदारसिंह राजपूत आणि लोणावळा शहर कार्याध्यक्ष संतोष दत्तात्रय कचरे पाटील यांनी सांगितले.पुढील वाटचालीस त्याना लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष नासिर भाई शेख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page