शिवणे येथील महसूल विभागाचे मंडल अधिकाऱ्याला २ लाख १० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले







मावळ मराठा न्युज -मावळ,मावळ तालुक्यातील शिवणे येथील महसूल विभागाचे मंडल अधिकाऱ्याला २ लाख १० हजाराची लाच स्वीकारताना मंगळवारी दि १५ जुलै रोजी रंगेहाथ पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भोसरी पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली.अशा गैरप्रकारांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा मावळ तालुक्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचार या प्रकरणामुळे चव्हाट्यावर आला आहे.याप्रकरणी मारुती महादेव चोरमले (५३)असे अटक केलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह खासगी व्यक्ती जयेश बाळासाहेब बारमुख (३३, चांदखेड, मावळ) यालाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.




