लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा आणि मन्शक्ती प्रयोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव मावळ येथे आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा आणि मन्शक्ती प्रयोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केशवनगर,वडगाव मावळ येथील स्व. गोपाळराव देशपांडे निवासी विद्यार्थी वसतिगृहात आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करून आवश्यक ती औषधे मोफत देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा मोठ्या उत्साहाने लाभ घेतला.या उपक्रमाचे नेतृत्व लायन नंदकिशोर खंडेलवाल यांनी केले. तसेच लायन्स क्लब अध्यक्षा लायन कांता ओसवाल, लायन दीप्ती लुनावत, डॉ. पोपट ओसवाल, डॉ. सुहास गोसावी, शांती परब (सामाजिक कार्यकर्त्या), अनुराधा कॉन्ट्रॅक्टर. .सुधीर रिलकर, श्री देशकर, अभय जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.— लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा(सामाजिक आरोग्य सेवा उपक्रम)

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page