महिला मंडळ लोणावळा यांच्या वतीने नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे यांचेकडे लोणावळेकरांना डॉ.सह कार्डयाक ॲम्बुलन्स सेवेची मागणी

मावळ मराठा न्युज – लोणावळा,महिला मंडळ लोणावळा यांच्यातर्फे नुकतेच नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना कार्डयाक ॲम्बुलन्स लोणावळा नगरपालिकेतर्फे उत्तम डॉक्टर सहित उपलब्ध करावी अशा आशयाचे पत्र देण्यात आले. नगराध्यक्ष सोनावणे यांनीही त्यास चांगला प्रतिसाद देत आमची ही तयारी आहे असे सांगितले. लोणावळ्यामध्ये अजूनही चांगल्या आणि मोठ्या सुविधा असलेले हॉस्पिटल नाही काही बाका प्रसंग आला तर पुण्याला जावे लागते. त्यामुळे रुग्णसेवेसाठी ही ॲम्बुलन्स लवकरात लवकर उपलब्ध करावी अशी विनंती महिला मंडळ अध्यक्ष मनीषा बंबोरी यांनी केली. अत्यावश्यक आणि तातडीच्या उपचारासाठी कार्डयक ॲम्बुलन्स अत्यंत जरुरी आहे. याप्रसंगी महिला मंडळ अध्यक्ष सौ मनीषा बंबोरी, उपाध्यक्ष सो मेधा वैद्य,सेक्रेटरी सो प्रतिमा खळदकर, खजिनदार सौ सुनीता रावण, सहखजिनदार सौ श्रुतिका राणे तसेच महिला मंडळाच्या सल्लागार अश्विनी धारप उपस्थित होत्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page