लोणावळ्यातील राममंदिरात भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

{

मावळ मराठा न्यूज – लोणावळा,लोणावळ्यात श्रीराम मंदिर भांगरवाडी च्या प्रांगणात भव्य हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या संमेलनाला मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज खर्चे, अॅड. मोनाली कुलकर्णी-शेलार आणि प्रमुख वक्ते सुनील काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात संभाजी पडवळ आणि वैशाली साखरेकर यांनी संमेलनाच्या उद्देशाविषयी सविस्तर विवेचन केले. यात अॅड. मोनाली कुलकर्णी यांनी हिंदू विवाह संस्था संस्कार याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत विवाह एक पवित्र सामाजिक व्यवस्था असल्याचे सांगितले. “विवाह म्हणजे समर्पण असून स्त्रीला मोठा आदर दिला जातो. मुलांमध्ये लहानपणापासून संस्कार रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. संवाद आणि जागरूकता यामुळेच समाजातील विकृती रोखता येऊ शकतात,” असे त्यांनी यावेळी नमूद केले. ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज खर्चे यांनी हिंदू धर्म संत आणि सनातन याबद्दल सविस्तर विश्लेषण केले.आज धर्म निष्ठा,गुरु निष्ठा हळू हळू निसतट चालली असल्याची खंत व्यक्त केली. संत तुकाराम,संत नामदेव वारकरी संप्रदायतील दाखले देत हिंदू धर्म हा सनातन आहे त्याचा कधी ही अंत नाही सांगत आचार,विचार आणि प्रचार यावर त्यांनी धर्म जागृतीचे महत्व विषद केले. तर प्रमुख वक्ते सुनील काळे यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू धर्म कसा टिकून राहील पुन्हा आधी सारखे भारत कुणाच्या गुलामगिरीत जाणार नाही यासाठी संत महंत यांच्या भेटी गाठी घेऊन त्यातील दोष यांचे निवारण साठी प्रयत्न करीत आहे.याबाबत विश्लेषण केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page