माणुसकीचं नातं जपणारं,सामाजिक बांधिलकीची तळमळ म्हणजेच श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ


मावळ मराठा न्यूज़:- पिम्परी गेली ५ दिवस हे बाबा भोसरीच्या पुला खाली दिसत होते कुणाकडे काही मागत नव्हते कुणी दिलेलं खात नव्हते आपल्या मंडळाचे कार्यकर्ते राहुल रानेर यांनी त्यांच्या अवती भवती फिरून पाहल्यास त्यांचं जवळ आधार कार्ड आढळून आले त्यांनी त्याची कल्पना मंडळातील श्री धीरज झोडगे यांनी दिली आणि झोडगे यांनी सदरील माहिती त्यांचे मामा श्री देवा गिरमे यांना दिली,श्री देवा गिरमे यांनी आधार कार्ड वरील पत्त्यावरून सदरील व्यक्ती ही लोणी धामणी मधील असल्याचे कळाले,श्री देवा गिरमे यांनी त्यांचे कान्हूर मेसाई येथील त्यांचे मित्र श्री दादा बोऱ्हाडे यांना दिली त्यांनी लगेचच ती माहिती लोणी धामणी मधील व्हाट्सअप ग्रुपवर पाठवली आणि 5 दिवस सुरु असलेल्या बाबांचा शोध थांबला त्यांच्या मुलांनी श्री देवा गिरमे यांच्याशी सपंर्क करुन बाबांना आपल्या सोबत घेऊन गेले,जाताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान स्पष्ट दिसत होतं त्यांना आभार व्यक्त करायला शब्द सुचत नव्हते.त्यांना आम्ही नवरात्र मध्ये बाबा बरे झाले की सहकुटुंब आरती साठी आमंत्रित केलं.आमचं मंडळाचे उद्धिस्ट हे नुसतं समाजाकडून वर्गणी घेणं नसून,समाजाशी आपली जी आपुलकीची नाळ जुळली आहे त्याच्याशी बांधील राहून समाजाला देणं सुद्धा लागतं या भावनेने मंडळ मार्गक्रमण करत आहे .




