मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी यांची निगडीत बैठक संपन्न,६ जुनला तहसिलदार कार्यालयावर मोर्चा – युवराज दाखले



मावळ मराठा न्युज :-पिंपरी- प्रतिनिधी,महा- मेट्रोच्या कामामुळे सा.लो.डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे होणारे नुकसान व समाजाच्या भावनांना दुखवण्याचा हेतु दिसून येत असल्याने समाजाने एकत्रित येऊन याविरोधात लढा दिला पाहिजे यासाठी बैठक सा लो डॉ आण्णा भाऊ साठे स्मारक निगडी या ठिकाणी घेण्यात आली.या स्मारकाच्या लढ्याचे अध्यक्ष पद संदिपान झोंबाडे यांच्याकडे सर्वानुमते देण्यात आले. अनुमोदन मनोज तोरडमल यांनी दिले.दरम्यान या बैठकीत मातंग समाजाच्या प्रमुख प्रश्नावर गुरूवार दि ६ जुन २०२४ रोजी तहसीलदार कार्यालयावर अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा ठराव करण्यात आला.1)मेट्रोच्या कामामुळे सा.लो.डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे होणारे नुकसान व समाजाच्या भावनांना दुखवण्याचा हेतु दिसून येत असल्याने समाजाने एकत्रित येऊन याविरोधात लढा देण्यात येणार २) सा लो डॉ आण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन यमुनानगर निगडी येथील अतिक्रमणे काढून समाजाच्या ताब्यात देण्यात यावे.३) आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत घेण्यात यावे.४) संत तुकाराम येथील हाफकिन महामंडळाच्या पाच एकर जागेवर आर्टीची निर्मिती करण्यासाठी तसेच वरील सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी संदिपान झोंबाडे, चंद्रकांत दादा लोंढे मनोज तोरडमल,डी पी खंडाळे, नानासाहेब कसबे,आण्णासाहेब कसबे, संजय धुतडमल, रामदास कांबळे, लोकसेवक युवराज दाखले, अनिल गायकवाड, आबासाहेब मांढरे,मोहन भिसे, अशोक कलवले, गणेश कलवले, अविनाश शिंदे,नानासाहेब कांबळे, रमेश अडागळे, विठ्ठल कळसे,रामदास केंदळे, विठ्ठल शिंदे,राजु आवळे, अनिल तांबे, वसंत वावरे, मंगेश डाखोरे,रूषीकेश कसबे,दशरथ कांबळे, सविता आव्हाड,भारती चांदणे,सीमा खुडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीचे आयोजन आण्णासाहेब कसबेअध्यक्ष- सा. लो. डॉ. आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती. व संजयजी धुतडमल अध्यक्ष – आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे प्रबोधन पर्व. सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर यांनी केले.




