लोणावळ्यातील सहारा ब्रिज,मुंबई पुणे महामार्ग लगतच्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत मॅगी टपरी, खाद्यपदार्थ स्टॉलवर होणार कारवाई- सत्यसाईं कार्तिक

मावळ मराठा न्यूज़:-लोणावला, लोणावळा शहर मधील मुंबई पुणे महामार्ग लगत आणि सहारा ब्रिजवर असणाऱ्या अनधिकृत मॅगी टपरी व इतर खाद्य पदार्थ विकणाऱ्यां स्टॉल व टेम्पो वर लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक,आय एस सत्यसाई कार्तिक अश्या पर्यटक नगरीच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि स्टॉल वरुन आपल्या वर्चस्वाची लढाईत हानामारी होत असल्याने लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात सत्यसाई कार्तिक यांनी मुख्याधिकारी,लोणावला नगरपरिषद,कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या अनधिकृत मैगी टपऱ्या खाद्यपदार्थ टेम्पो वाहतूक साठी अडथळे ठरत असतील तर ती क़ायमस्वरूपी बंद झाली पाहिजे अशी भूमिका सत्यसाई कार्तिक यांनी उपस्थित केलि आहे.त्यामुळे येत्या काळात अश्या मैगी,खाद्यपदार्थ विकणारे टेम्पोवाले,यांचेवर कड़क कारवाई होण्याचा इशाराच सत्यसाईं कार्तिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page