मातंग साहित्य परिषद आयोजित मातंग ऋषी साहित्य संमेलन अध्यक्षपदी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची निवड


मावळ मराठा न्यज :-पिंपरी – प्रतिनिधी,मातंग साहित्य परिषद आयोजित मातंगरूषी साहित्य संमेलन अध्यक्षपदी पद्मश्री गिरीश प्रभुणे गुरूजी यांची निवड झाल्याबद्दल सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहर व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या वतीने अध्यक्ष आण्णासाहेब कसबे व राजु आवळे यांच्या नेतृत्वाखाली सन्मान करण्यात आला.यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांच्या वतीने डॉ हेडगेवार यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून चंदन टिळा लावून दिवा बत्ती करून अभिवादन करण्यात आले.यावेळी लोकसेवक युवराज दाखले, आण्णासाहेब कसबे,राजु आवळे,दादा अल्हाट, माणिक पौळ, गणेश कलवले, साहित्यिक असाराम कसबे, मंगेश डाखोरे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




