लोणावळ्यात वन स्टेशन एक उत्पादन स्टॉल कार्यक्रमाचे आयोजन



मावळ मराठा न्युज :-लोणावळा -भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विडिओ कॉन्फरन्स मार्फत मुंबई विभाग मध्य रेल्वेवरील “वन स्टेशन एक उत्पादन स्टॉल” कार्यक्रमाचे उद्घाटन आणि वंदेभारत रेल्वेला हिरवा झेंडा आणि विविध रेल्वे विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.लोणावळ्यात बुकिंग ऑफिस जवळ झालेल्या या कार्यकमात मावळचे खासदार श्रीरंग बारणे,मुंबई मंडलचे रेल्वे प्रबंधक शशी भूषण,अभियंता मोहम्मद नुजीमुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रेल्वे प्रशासनाकडून माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,श्रीधर पुजारी,राजू खांडभोर अरुण लाड,संजय भोईर,रामविलास खंडेलवाल,मंदासोनावणे,भाजप महिला अध्यक्षा वाळुंज आदी मान्यवारांचा य सत्कार करण्यात आला.लोणावळा स्टेशन मॅनेजर बी एस राजपूत रतन खत्री रेल्वे अधिकारी आर पी एफ स्टाफ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




