आषाढी वारी विठ्ठल नामाचा रे टाहो….प्रेमभावो

मावळ मराठा न्युज :-दि.६/०७/२०२४,काय जादू आहे ना विठ्ठल नामात जिथे आबालवृद्ध सर्वचजणांचे देहभान हरपते.एरवी फिरायला गेल्यावर गृहमंत्र्यांनी लेकराला कडेवर घ्या म्हटलं की चिडचिड करणारे नवरे,वारीत मात्र मुलाला फुलासारखं हलकं समजून खांद्यावर घेत त्याला वारीच्या वातावरणात, संस्कारात सामील करतात…..विठू नामाचा गजरात देहभान विसरते, खांद्यावरचं भार,भार न वाटता प्रत्यक्ष विठ्ठल भासतो….जिथं नाम तिथं मी आहे हे तो सदेह दाखवत,भक्तांच्या भक्तीला नमस्कार करत, तुमच्या आमच्यात मिसळून नामजागरात देहभान हरपून सामील होतो…..बोला पुंडलिक वरदे…. हरी विठ्ठल…..

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page