नाट्य सम्मेलनासाठी दिवस रात्र झटणारे आमचे धोत्रे काका आणि शासनातर्फे झालेला यथोचित सन्मान

मावळ मराठा न्युज :-हर्षल आल्पे,तळेगाव,शंभराव्या नाट्यसंमेलनातील समारोपाचा कार्यक्रम तळेगावातील पवार हॉस्पिटलच्या समोर २४ तारखेला सहा वाजता झाला ..त्याच्यात चला हवा येऊ द्या हा लोकप्रिय कार्यक्रम झाला.याच कार्यक्रमाची लगबग सध्या तळेगाव दाभाडे येथे सुरू आहे. हे संमेलन आपल्या मावळ तालुक्यासाठी भूषणावह आणि अभिमानास्पद ठरलंय यात शंका नाही. हे संमेलन ऐतिहासिकच होते. आणि ते सर्वांच्याच कायम स्मरणात राहील. यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखा आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारणीतील समस्त पदाधिकारी यासाठी अपार कष्ट केले आहेत.विशेष उल्लेख म्हणजे सर्व कार्यकर्त्यांबरोबर दिवस रात्र तहानभूक विसरून काम करणारे “सुरेश धोत्रे ” …… खरं तर त्यांना सहज शक्य होतं, एजंसीला कंत्राट देऊन सहज ऐटीत कार्यक्रमाला येणार,पण काका तसे नाहीत,तर काका सर्वांसमवेत दुप्पट उत्साहाने काम करून एखाद्याला लाजवतील(विशेषतः एखाद्या निराशावाद्याला) नाटकासाठी,रंगभूमीसाठी असणारी धोत्रे काकांची तळमळ ही क्वचितच रंगभूमीसाठी एखाद्या राजकीय नेत्यांची दिसते……स्वतःच्या तब्येतीचा कसलाही विचार न करता माझ्या तळेगाव दाभाडे या गावाला १०० व्या नाट्यसंमेलनाचा मान मिळाला पाहिजे. ‘याचेसाठी केलेला अट्टाहास ‘ यासाठी काकांनी जीवाचे रान केले. ‘ आणि अखेर तळेगावला १०० व्या नाट्यसंमेलनाचा एक भाग मिळाला.’ आणि याच दाखवलेल्या तळमळीमुळे आणि केलेल्या कष्टामुळे हा कार्यक्रम यशस्वीही झाला …..तळेगावातील सांस्कृतिक चळवळीचा हा मानबिंदू निश्चितच होता.तर निमित्त आहे, वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन देण्यासाठी महाराष्ट्र शासन जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन केली असून त्याच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे म्हणजेच आमचे धोत्रे काका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि या निमित्ताने समस्त तळेगावकर नागरिकांना ही खात्री आहे, या समितीत माजी नगराध्यक्ष तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे अगदी झपाटून काम करून वृद्ध साहित्यिक व कलावंत यांचा यथोचित सन्मानच करतील यात शंका नाही.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page