८ डिसेंबरला शंभर दिव्यांग बांधवांचा सामुदायिक विवाह सोहळा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सांस्कृतीक भवन निगडी येथे होणार संपन्न



मावळ मराठा न्युज:-पिंपरी,प्रतिनीधी,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सांस्कृतीक भवन निगडी(मधुकर पवळे क्रिडांगन)यमुनानगर निगडी या ठिकाणी जवळपास १०० दिव्यांग बांधवांचा विवाह सोहळा दिनांक ८डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. त्यानिमित्त लोकसेवक युवराज दाखले यानी आयोजक हरिश्चंद्र सरडे यांचा सन्मान केला.पिंपरी चिंचवड शहरात महायुतीचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडुण आल्याने आज हेमंत (काका)हरहरे व साहित्य रत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन निगडी (मधुकर पवळे क्रिडांगन)या ठिकाणी दिनांक ८डिसेंबर २०२४रोजी शंभर दिव्यांग बांधवांचा सामुदायिक विवाह सोहळा करणारे सन्माननिय हरिश्चंद्र सरडे यांचा सन्मान मातंग चेतना परिषद पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तथा जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे व शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी शाल व फकिरा कादंबरी भेट देऊन सन्मान करण्यात आला.




